Posts

आय ओपनिंग

अतिशय गंभीर लेख... आय ओपनिंग "मैकौले च्या तथाकथित आधुनिक शिक्षण व्यवस्थेने भारतवासियांचे कंबरडे मोडुन भावि पिढीचे भविष्य अक्षरशः अंधकारमय केले" *कुणी उध्वस्त केली भारतीय व्यवस्था  "भारत हा कधीच फक्त कृषीप्रधान नाही तर उद्योग प्रधान देश होता"* *जळजळीत, उघडी नागडी सत्ये जी प्रत्येक भारतीय व्यक्तीने आपल्या नरड्यात हलाहल म्हणून ओतून घेणे अत्यंत आवश्यक आहे..*   १) आई वडिलांचे गुण लहान मुलांच्यामध्ये उतरतात. मग त्याच गुणांना पोषण देणारे वातावरण असेल तर ती मुले आई वडिलांच्या पेक्षा त्या क्षेत्रात अधिक प्रगती करतात. हे जेनेटिक्स अर्थात वंशशास्त्राच्या अभ्यासकांनी सुद्धा सिद्ध केले आहे.  २) १००० पैकी ९९९ मुले सामान्य असतात. अद्वितीय किंवा लोकोत्तर गुण घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प असते. बाकी मंडळी सर्वसामान्यच असतात.  आपल्या जुन्या बारा बलुतेदारी या संकल्पनेला आपण ब्रिटीशांच्या कृपेने आणि मॅकालेच्या शिक्षणाने संपवून टाकून नक्की काय गोंधळ निर्माण केला आहे आणि हा सार्वत्रिक पातळीवर आपल्या समाजाला कसा उध्वस्त करतो आहे ते समजून घ्या.  *बारा बलुतेदारी म्हणजे एक विश

अलंकारिक शब्द संग्रह

अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात त्यांचा उपयोग लोगो डिझाईन करतांना होत असतो असेच काही अलंकारिक शब्दाचा हा आभ्यास १) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस २) अकलेचा कांदा : मूर्ख ३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य ४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार ५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला ६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे ७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस ८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट ९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार १०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात ११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा १२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू १३) कर्णाचा अवतार : उदार माणूस १४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा १५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा १६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस १७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस १८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा १९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री २०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी २१) खडास्टक : भांडण २२) खुशालचंद : अतिशय चैनिखोर २३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे २४) गप्पीदास : थापा गप्पा मारणारा २४) गर्भश्रीमंत : जन्मा

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

म्हणी म्हणजे कमी शब्द वापरून एखाद्या विषयावर अधिक समर्पक भाष्य करणे होय म्हणी ह्या प्रत्येक भाषेत लिहिलेल्या असतात; म्हणीचा उपयोग लोगो डिझाईन करतांना करून घेता येतो १) अती तेथे माती : कोणत्याही गोष्टीचा अती वापर / अतिरेक हा नुकसान कारक ठरतो. २) अती शहाणा त्याचा बैल रिकामा : जो माणूस जादा शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. ३) अडला हरी गाढवाचे पाय धरी : शहाण्या माणसाला मूर्खाची विनवणी करावी लागते. ४) असतील शिते तर जमतील भुते : आपल्या भरभराटीचा काळ असेल तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात. ५) आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी : जेथे मदतीची गरज आहे तिथे ती न पोहचता भलत्याच ठिकाणी पोहचवणे. ६) आगीतून फुपाटयात : लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे. ७) आधी पोटोबा मग विठोबा : आधी स्वतः च्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे. ८) अंथरून पाहून पाय पसरावे : ऐईपतीच्या मानाने खर्च करावा. ९) आवळा देऊन कोहळा काढणे : क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. १०) आयत्या बिळात नागोबा : दुसऱ्याच्या कस्टावर स्वत:चा स्वार्थ साधने. ११) आलिया भोगाशी असावे सादर : जे नशिबात असेल ते भोगाय

लोगो ब्रान्ड डिझाईन

ब्रान्ड डिझाईन कसा करावा ? १) ब्रान्ड तयार करण्यासाठी ग्राहकाला उत्कृष्ट सेवा देणारी उत्पादने किवा सेवा देणारी कंपनी म्हणून मेहनत घेऊन प्रसिद्ध होणे आवश्यक आहे २) चागली सकारात्मक ओळख म्हणजेच ब्रान्ड होय. ३) उत्पादनामध्ये नाविन्य प्रत्येकवेळेस काहीतरी नवीन उत्कृष्ट असावे ४) पैशाचा पुरेपूर मोबदला देण्याची क्षमता उत्पादनामध्ये असणे आवश्यक असते ५) उत्पादनाच्या प्लस माईनस गोष्टीचा सखोल विचार करून त्या गोष्टीवर अधिक मेहनत घेऊन त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी / कमतरता दूर कराव्यात ६) उत्कृष्ट सेवा देणारी कंपनी आणि त्यांची ग्राहकाच्या मनात निर्माण होणारी प्रतिमा म्हणजेच ब्रान्ड इमेज होय. ग्राहकाच्या मनात असणारी सकारात्मक प्रतिमा व्हीज्वलाईज करून त्याला एक मूर्त सरूप प्राप्त करून त्याला प्रत्येक्षात उतरवणे म्हणजेच ब्रान्ड डिझाईन करणे होय उदा जशे एखाद्या महान व्यक्ती विषयी समाज मनात, साहित्यातून, लिखाणातून जे गुणवर्णन केलेले असते त्याचा आभ्यास करून त्याच्या आधारे एखादा कलाकार त्या व्यक्तीचे चित्र किवा पुतळा तयार करतो म्हणजेच ती माहिती दृश्य स्वरुपात साकारतो त्याच प्रमाणे एखाद्या कंपनीचा सर

लोगो डिझाईन

लोगो म्हणजे काय ? लोगो म्हणजे कंपनीच्या नावाची विशिष्ट कलात्मक रचना ज्यामधून कंपनीच्या विषयी एक विशिष्ठ सकारात्मक प्रतिमा तयार होईल.          एका चित्राचे मोल हजार शब्दाएवढे आहे आणि एका सिम्बॉलचे मोल हजार चित्राएव्हडे आहे; कंपनीच्या विषयी जे हजार चित्रांनी आणि हजारो शब्दात जे व्यक्त होऊ शकणार नाही ते एका लोगो मधून सिम्बॉल मधून व्यक्त होते.           लोगो म्हणजे कंपनीच्या नावाचे सिम्बोलिक मांडणी, रचना होय; कंपनीची खरी ओळख कंपनीचा चेहरा; सिम्बोलिक व्हीज्वल प्रेझेंटेशन.    लोगो हा कंपनीचा चेहरा असतो आणि कंपनीची सेवा हे कंपनीचे शरीर आहे असे म्हणता येईल कंपनीचा चेहरा (लोगो) हा बोलका असावा फ्रेश असावा, लोगो मधूनच कंपनीची सर्व माहिती ग्राहकाला समजेल अशी त्याची रचना, मांडणी, डिझाईन असावे उदा. कंपनी कोणत्या सुविधा देते त्या सुविधा, सर्व्हीसेस ग्राहकाला कुठे व कशी उपलब्ध होईल आणि त्या उत्पादनाची माहिती देणारे चित्र सिम्बॉल हे त्या लोगोमध्ये सामावलेले असावे सिम्बॉल म्हणजे एखाद्या गोष्टीचे प्रतिक एखाद्या वस्तूला दुसऱ्या वस्तूची उपमा देणे आणि ती वस्तू तशाच प्रकारची आहे आसे व्हीज्वल तयार कर