मराठी म्हणी व त्यांचे अर्थ


म्हणी म्हणजे कमी शब्द वापरून एखाद्या विषयावर अधिक समर्पक भाष्य करणे होय म्हणी ह्या प्रत्येक भाषेत लिहिलेल्या असतात; म्हणीचा उपयोग लोगो डिझाईन करतांना करून घेता येतो

१) अती तेथे माती : कोणत्याही गोष्टीचा अती वापर / अतिरेक हा नुकसान कारक ठरतो.
२) अती शहाणा त्याचा बैल रिकामा : जो माणूस जादा शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते.
३) अडला हरी गाढवाचे पाय धरी : शहाण्या माणसाला मूर्खाची विनवणी करावी लागते.
४) असतील शिते तर जमतील भुते : आपल्या भरभराटीचा काळ असेल तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात.
५) आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी : जेथे मदतीची गरज आहे तिथे ती न पोहचता भलत्याच ठिकाणी पोहचवणे.
६) आगीतून फुपाटयात : लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.
७) आधी पोटोबा मग विठोबा : आधी स्वतः च्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे.
८) अंथरून पाहून पाय पसरावे : ऐईपतीच्या मानाने खर्च करावा.
९) आवळा देऊन कोहळा काढणे : क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
१०) आयत्या बिळात नागोबा : दुसऱ्याच्या कस्टावर स्वत:चा स्वार्थ साधने.
११) आलिया भोगाशी असावे सादर : जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे.
१२) आपला हात जगन्नाथ : आपले काम पार करण्यासाठी स्वतःच कस्ट सोसणे योग्य ठरते.
१३) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार : जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ.
१४) आंधळा मागतो एक देव देतो दोन : किमान लाभाची अपेक्षा केली असताना, अपेक्षापेक्षा किती तरी अधिक लाभ होणे.
१५) इकडे आड तिकडे विहीर : दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे.
१६) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिग : उतावळेपणाने मुर्खासारखे वर्तन करणे.
१७) उचलली जीभ लावली टाळ्याला : विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे.
१८) उथळ पाण्याला खळखळाट फार : ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो.
१९) ऊस गोड लागला म्हणून मुलासकट खाऊ नये : एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये.
२०) एक ना धड भाराभर चिंध्या : एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.
२१) एका हाताने टाळी कधीच वाजत नाही : कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात.
२२) ऐकावे जनाचे करावे मनाचे : कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे.
२३) कर नाही त्याला डर कशाला : ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
२४) करावे तशे भरावे : दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.
२५) कामापुरता मामा : गरजेपुरता गोड बोलणारा, मतलबी माणूस.
२६) काखेत कळसा गावाला वळसा : हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात आल्याने सर्वत्र शोधत राहणे.
२७) काळ आला होता पण वेळ आली नव्हती : एखादे घोर संकट येऊनही त्यातून सहीसलामत सुटणे.
२८) कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ : आपलाच माणूस आपल्याच नुकसानीला कारणीभूत होणे.
२९) कोठे इंद्राचा ऐरावत कोठे शामभट्टाची तट्टाणी : अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही.
३०) कोळसा उगळावा तितका काळाच : दुष्ट माणसाबद्दल अधिक माहिती मिळविली असता अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात.
३१) कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही : निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
३२) कोंड्याचा मांडा करून खाणे : हालाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळते त्यावर जगण्यात समाधान मानणे.
३३) कोल्हा काकडीला राजी : सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुस्ट होतात.
३४) खाई त्याला खवखवे : जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
३५) खाण तशी माती; बाप तसा बेटा; खाण तशी माती : आईवडीलाप्रमाणे मुलाची वर्तणूक असणे.
३६) खाईन तर तुपाशी नाहीतर तुपाशी नाहीतर उपाशी : एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे, यापैकी एकाची निवड करणे.
३७) खायला काळ भुईला भार : निरोद्योगी मनुष्य सर्वाना भारभूत होतो.
३८) गरजवंताला अक्कल नसते : गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते.
३९) गर्वाचे घर खाली : गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो.
४० ) गरज सरो वैद्य मरो : आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे.
४१) गर्जेल तो बरसेल काय ? : जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एखादा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही.
४२) गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली : एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे.
४३) गुरूची विद्या गुरूला कळली : एखाद्याचा डाव त्याच्यावर उलटणे.
४४) गोगलगाय नि पोटात पाय : एखाद्याचे खरे स्वरूप दिसणे.
४५) घरोघरी मातीच्या चुली : सर्वत्र सारखीच परीस्तीती असणे.
४६) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे : प्रत्येकाला आयुष्यात कधी न कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच.
४७) चोराच्या मनात चांदणे : आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे.
४८) चोर सोडून संन्याशाला सुळी देणे : अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा देणे.
४९) शेरास सव्वाशेर : एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे.
५०) पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये : जेथे राहायचे तेथील माणसाबरोबर वैरभाव ठेऊ नये
५१) जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे : दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही.
५२) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही : मुलाचा स्वभाव कधीच बदलत नाही.
५३) जे न देखे रवी ते देखे कवी : कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे पाहू शकतो.
५४) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी : ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनकूल असावे.
५५) झाकली मुठ सव्वा लाखाची : मौन पाळून अब्रू राखणे.
५६) टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही : अपार कष्टावाचून मोठेपणा मिळत नाही.
५७) डोंगर पोखरून उंदीर काढणे : अतोनात श्रमानंतर अत्यअल्प फायदा होणे.
५८) तळे राखी तो पाणी चाखी : एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडातरी उपभोग घेणारच.
५९) तहान लागल्यावर विहीर खणणे : एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे.
६०) ताकापुरती आजी आणि कामापुरता मामा: स्वार्थ साधण्यापुर्तेच एखाद्याचे गुणगान करणे.
६१) थेंबे थेंबे तळे साचणे : थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो.
६२) दगडापेक्षा वीट मऊ : मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.
६३) दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत : अनुकूल परीस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे.
६४) दाम करी काम : पैशाने सर्व कामे साध्य होणे.
६५) दिव्याखाली अंधार : मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच.
६६) दुरून डोंगर साजरे : कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते.      

Comments

  1. No awadnare mansane kithi hi changli gosht kaili Tari ti white diste kya tay vyakti kam audit naahi

    ReplyDelete
  2. 😘😎🤟🤟😀🥰😘🥯😎🥯🤟🎁🧸🎁🧸🥔😎🌰🥔🥫🎉😎🎉🤟🎁🌰🎁🤟🎉😎🤟🎁🎉😎🍥🤟😎🌰🎁🎉😎🎉🤟🎁😎🎉🎁🥯🥔🥖🧸🥔🥜🧸🥯🥜🥔🥖🍞😊🥖🧸🧸🥜😎🥯🤟😏😕🙄🤫😒😧😏😨🙄🥺🙄😧😮😟😥🧐😨😟😨🥺😓😯😵😮😓😳🥺😟😨😏🧐😰🌛🌜🤖🌛👺🤑🙊🤑☠️🤡😹🤑🤖🌛😪🙉😤🌝😪😇👺🤥🌚👿🥶🥵🥵🤒💞💓💓💗💖💖💚♥️💌💘♥️💌♥️💘💕♥️🖤💞💯💯💋💋🗯️🗯️💞🗯️💬🔥✨💟💦👁️‍🗨️💤✨👁️‍🗨️🗨️🔥💬🔥💬🤞🤚✋✋🤙✋🖐️🤙🤟🖐️🤟✊✊🤛🤛✌️✊🙅💁💇💇🤷🛌🙍🙍🏃🚵👩‍🎤👶👩‍🎤👩‍🔬👶👩‍🔧👩‍🔬👲👩‍✈️🧕👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👨‍👧‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧👨‍👨‍👧‍👧👩‍👩‍👦👩‍👩‍👧🔥🌥️🌇⚡🌩️⛈️🌨️✨⛈️⭐🌈🌈⚡🦁🌗🐻🐗🦓🐴🐨🐗🐗🐰🙊🙉🙊🦁🐯🐶🐺🦌🐃🐕🐅🕹️🎰👾🖌️🕹️🖼️🎮🎮🎰📞🇰🇷🇮🇲🇯🇲🇮🇳🇮🇴🇮🇱🇯🇪🇮🇱🇮🇹🇮🇴🇮🇲🇮🇱🇯🇪🇮🇷🇯🇲🇮🇸🇮🇴🇮🇳🇯🇲🇮🇶🇰🇮🇮🇴🇯🇴😝😘😘😉😝😚🙂😛😚🙂😘😊😚🤗😊😁😚🤗😆🙃😊😜🙃😊😜😘🙂😜☺️😘🙃😊🙃☺️😘🙃

    ReplyDelete
  3. It is were nice 👏👏👏👏👏👏👏👏😊😊😊👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. 🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖖

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलंकारिक शब्द संग्रह

लोगो डिझाईन