लोगो ब्रान्ड डिझाईन

ब्रान्ड डिझाईन कसा करावा ?

१) ब्रान्ड तयार करण्यासाठी ग्राहकाला उत्कृष्ट सेवा देणारी उत्पादने किवा सेवा देणारी कंपनी म्हणून मेहनत घेऊन प्रसिद्ध होणे आवश्यक आहे
२) चागली सकारात्मक ओळख म्हणजेच ब्रान्ड होय.
३) उत्पादनामध्ये नाविन्य प्रत्येकवेळेस काहीतरी नवीन उत्कृष्ट असावे
४) पैशाचा पुरेपूर मोबदला देण्याची क्षमता उत्पादनामध्ये असणे आवश्यक असते
५) उत्पादनाच्या प्लस माईनस गोष्टीचा सखोल विचार करून त्या गोष्टीवर अधिक मेहनत घेऊन त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी / कमतरता दूर कराव्यात
६) उत्कृष्ट सेवा देणारी कंपनी आणि त्यांची ग्राहकाच्या मनात निर्माण होणारी प्रतिमा म्हणजेच ब्रान्ड इमेज होय.

ग्राहकाच्या मनात असणारी सकारात्मक प्रतिमा व्हीज्वलाईज करून त्याला एक मूर्त सरूप प्राप्त करून त्याला प्रत्येक्षात उतरवणे म्हणजेच ब्रान्ड डिझाईन करणे होय

उदा जशे एखाद्या महान व्यक्ती विषयी समाज मनात, साहित्यातून, लिखाणातून जे गुणवर्णन केलेले असते त्याचा आभ्यास करून त्याच्या आधारे एखादा कलाकार त्या व्यक्तीचे चित्र किवा पुतळा तयार करतो म्हणजेच ती माहिती दृश्य स्वरुपात साकारतो त्याच प्रमाणे एखाद्या कंपनीचा सर्व अभ्यास करून त्या कंपनीची इमेज सिम्बॉल अश्या विशिष्ट रचनेतून साकार होतो आणि तीच इमेज कंपनीची ओळख बनते त्या व्हीज्वलला ब्रान्ड डिझाईन असे म्हणता येईल  

Comments

Popular posts from this blog

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

अलंकारिक शब्द संग्रह

लोगो डिझाईन